जुने फेरफार नोंदवही, Online Ferfar Download, फेरफार उतारा

मित्रांनो कोणत्याही जमिनीचा ताबा कोणाकडून कोणाकडे कशाप्रकारे गेला त्याच्या सर्व नोंदी जुने फेरफार नोंदवही किंवा फेरफार उतारा या मध्ये असतात. 7/12 किंवा 8 अ या उताऱ्यांवर या नोंदी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे 7/12 किंवा 8 अ पेक्षाही Ferfar utara महत्त्वाचा असतो.

मित्रांनो या लेखांमध्ये आपण आपले जुने फेरफार नोंदवही, फेरफार उतारा किंवा ई-फेरफार कसे डाऊनलोड करायचे हे पाहणार आहोत. मित्रांनो हे उतारे डाऊनलोड करण्यासाठी खूप जास्त स्टेप्स आहेत आणि या मधील एक हि स्टेप्स चुकली तर आपल्याला आपले Online Ferfar Download करण्यास अडचण येऊ शकते. तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक वाचा आणि त्यांना फॉलो करा.

जुने फेरफार नोंदवही, फेरफार उतारा आणि इ-फेरफार

नमस्ते मित्रांनो आपल्याला विविध कामासाठी जुने फेरफार नोंदवही किंवा फेरफार उतारा या कागदपत्रांची आवश्यकता असते. पण ती तुमच्याकडे उपलब्ध नसतात ती खराब किंवा हरवलेली असतात. तसेच मित्रांनो आपल्याला ही कागदपत्रे काढण्यासाठी वारंवार महाभुलेख कार्यालयामध्ये जावं लागलं आणि ही कागदपत्रे मिळवण्यासाठी खूप वेळही लागतो. तर अशावेळी काय करायचे ? पण घाबरायचं कारण नाही मित्रांनो राज्यशासनाने ती कागदपत्रे सांभाळून ठेवली आहेत. महाराष्ट्र शासनाने आपले अभिलेख या पोर्टल वरती ही कागदपत्रे आपल्याला ई फॉर्मेट मध्ये उपलब्ध करून दिली आहेत.

आपले जुने जमिनीचे रेकॉर्ड आपण आता घर बसल्या पाहू शकतो. राज्य सरकारने 64 प्रकारचे जुने रेकॉर्ड आपले अभिलेख या पोर्टल वरती उपलब्ध करून दिली आहेत. असे हे महत्त्वाचे पाऊल राज्य सरकारने उचललेले आहे. त्यामुळे आपण मोबाईल वरुन ही घर बसल्या आपले Online Ferfar Download करू शकतो.

आपले अभिलेख पोर्टल ( Aple Abhilekh Portal)

महाराष्ट्र शासनाने आपले अभिलेख पोर्टल निर्माण केली आहे. या पोर्टल वर आपण आपली जुने फेरफार उतारा तसेच इ-फेरफार आणि अन्य कागदपत्रे आपण घर बसल्या आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या साह्याने प्राप्त करू शकतो. त्यामुळे आपल्याला वारंवार महाभुलेख कार्यालयामध्ये जावं नाही लागणार नाही आणि आपला वेळही वाचेल.

जुने फेरफार नोंदवही ई- अभिलेख या प्रकल्पा मार्फत राज्य सरकार आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील तब्बल 30 कोटी अभिलेख उतारे ऑनलाइन अभिलेख पोर्टल वरती आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. ही सर्व अभिलेख उतारे आपण PDF Format पोर्टल वरून डाऊनलोड करू शकतो.

उद्याचे हवामान कसे असेल

जुने फेरफार नोंदवही, ई-फेरफार | online Ferfar Download

फेरफार उतारा , e Ferfar Download ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा.

  • फेरफार उतारा डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला महाभुमी अभिलेख ई रेकॉर्ड या सरकारच्या अधिकारी पोर्टल वरती भेट द्यायची आहे.
  • महाभूमी अभिलेख ई रेकॉर्ड पोर्टल लिंक :- क्लिक करा
  • पोर्टल वरती गेल्यानंतर आपल्याला समोर स्क्रीन वरती लॉगिन पेज ओपन होईल.
जुने फेरफार नोंदवही login page
login page
  • लॉगिन पेज वरती लॉगिन आयडी, पासवर्ड टाकून कॅपच्या कोड भरून लॉगिन करायचे आहे.
  • जर तुमच्याकडे लॉगिन आयडी, पासवड नसेल तर आधी येथे New User Registration करायचं आहे.
  • खाली दिलेल्या स्टेप्स वाचून तुम्ही तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकता.

New User Registration करा | Online Ferfar

  • New User Registration करण्यासाठी आपल्याला लोगिन पेज वरती दिलेल्या New User Registration या बटन वरती क्लिक करायचे आहे.
  • क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म आपण काळजीपूर्वक भरायचा आहे.
New user Registration
New user Registration
  • यामध्ये आपण आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे जसे की नाव, मोबाईल नंबर, ई-मेल, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व इत्यादी माहिती भरायची आहे.
  • वैयक्तिक माहिती भरल्यानंतर आता इथे आपला पत्ता, घर क्रमांक, पिन कोड, स्थान, शहर, राज्य आणि जिल्हा ही सर्व माहिती भरायची आहे.
  • ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड बनवायच आहे. बनवून झाल्यानंतर आपल्यासमोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली असा मेसेज येईल.
  • लोगिन आयडी मिळाल्यानंतर पुन्हा लोगिन पेज वरती या.

जुने फेरफार नोंदवही, फेरफार उतारा, ई फेरफार ऑनलाइन काढा.

  • लॉगिन पेज वरती आल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून कॅपच्या कोड भरा आणि लॉगिन करा.
  • आता येते आपल्याला आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचा आहे. पुढे आपल्याला आवश्यक असलेली कागदपत्रे निवडायचे आहे. त्यानंतर value Box मध्ये आपल्या जमिनीचा गट नंबर टाकायचा आहे.
जुने फेरफार नोंदवही e ferfar
  • त्यानंतर Search बटन वर क्लिक करायचा आहे.
  • सर्च केल्यानंतर आता आपल्यासमोर विविध प्रकारची कागदपत्रे तुम्हाला दिसतील यांपैकी आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्रे डाऊनलोड करण्यासाठी Add to cart बटन वरती क्लिक करायचे आहे.
जुने फेरफार नोंदवही e ferfar download
  • आता Review Cart बटन वर क्लिक करा आणि Continue करा.
  • आता आपल्या समोर आपले कागदपत्रे दिसतील. पुढे दिलेल्या Add Available Files या बटन वरती क्लिक केल्यानंतर आपली कागदपत्रे आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईल मध्ये डाऊनलोड होतील.
Old Ferfar download
Old Ferfar download
  • आता तुम्ही आवश्यकतेनुसार या कागदपत्रांची Print काढू शकता.
  • अशा पद्धतीने आपण online Ferfar, जुने फेरफार नोंदवही फेरफार उतारा डाउनलोड करू शकतो.
ई फेरफार महत्वाची माहिती

शासनाने जुनी 64 प्रकारची कागदपत्रे या पोर्टल वरती उपलब्ध केली आहे तसेच ही कागदपत्रे काही ठराविक शहरांसाठी उपलब्ध आहेत.

पण जर तुमची कागदपत्रे तसेच तुमचे ठिकाण जर येथे उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या विभागाच्या महसूल कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करून ती कागदपत्रे मिळवू शकता.

फेरफार उतारा म्हणजे काय ?

फेरफार उतारा म्हणजे गाव नमुना 6 होय. ग्रामीण भागांमध्ये फेरफार उतारा खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला एखाद्या जमिनीची विक्री किंवा खरेदी करायची असते किंवा त्यावर वारीस नोंदणी करायची असतील तसेच शेतावर बीजा चढवायचा असतो. त्यासंदर्भातील लागणाऱ्या सरकारी कागदपत्रांना जमिनीचा फेरफार उतारा असे म्हणतात.

या फेरफार उताऱ्यांची आवश्यकता आपल्याला बऱ्याच जमिनीच्या कामांच्या वेळ पडते . जसे की जमीन खरेदी विक्री वारस नोंदणी याव्यतिरिक्त पण खूप जागी या उताऱ्यांची आवश्यकता लागते. हे उतारे काढण्यासाठी आपल्याला खूप वेळा सरकारी कार्यालयात भेट द्यावी लागते आणि यामध्ये खूप वेळ लागतो. पण तुम्ही वरती दिलेल्या माहितीनुसार आपली कागदपत्रे घरबसल्या ऑनलाइन पोर्टल वरून डाऊनलोड करू शकता.

फेरफार रद्द करण्यासाठी काय करावे ?

आपल्या तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे फेरफार रद्द करण्यावर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जवळील तहसीलदार कार्यालयास भेट द्यावी.

जुने फेरफार कसे पहावे ?

जुने फेरफार उतारे पाहण्यासाठी आपले अभिलेख या सरकारी पोर्टल वरती जाऊन मागितली जाणारी माहिती तेथे द्यावी त्यानंतर आपल्याला आपले जुने फेरफार उतारे पाहण्यास मिळतील.

फेरफार उतारा म्हणजे काय ?

फेरफार उतारा म्हणजे गाव नमुना 6 होय. फेरफार उतारे ची आवश्यकता आपल्याला जमिनीची विक्री खरेदी किंवा वारस नोंदणी अशा अनेक जमिनीच्या कामांच्या बाबतीत पडते.

Leave a Comment