गट नंबर इन ७ १२ उतारा ऑनलाइन डाउनलोड

मित्रांनो आज आपण गट नंबर इन ७ १२ कसा पाहायचा, म्हणजेच आपण आपला (७/१२) सातबारा उतारा ऑनलाईन कसा पाहायचा आणि डाउनलोड करायचा हे पाहणार आहोत. भूलेख महाभुमी पोर्टलवरून घरबसल्या आपण आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटर वरून ७/१२ आणि ८अ उतारा डाऊनलोड करू शकतो आणि त्याची प्रिंट काढू शकतो. महाराष्ट्रातील खूप साऱ्या मित्र बांधवांना ऑनलाईन पोर्टलवरून आपला सातबारा उतारा कसा पाहायचा आणि डाऊनलोड करायचा याची पूर्ण माहिती नाही आहे. पण आम्ही या आर्टिकल मार्फत तुम्हाला आपला सातबारा ऑनलाइन कसा पाहायचा हे सांगणार आहोत.

गट नंबर इन ७ १२ कसा पहायचा ? मित्रांनो जर आपल्याकडे गट नंबर सातबारा नसेल तर आपण सातबारा उतारा कसा पाहायचा किंवा आपल्याला गट नंबर माहिती नसेल तर तो कसा शोधायचा याची माहिती पुढे आपण या आर्टिकल मध्ये घेणार आहोत.

सातबारा उतारा | गट नंबर इन ७ १२ | गट नंबर सातबारा पहा

मित्रांना सध्या सर्वच गोष्टी डिजिटल झाले आहेत. आता शेतकऱ्याचा ७/१२ आणि ८अ, गट नंबर इन ७ १२ उतारा सुद्धा डिजिटल झालेला आहे. तर डिजिटल स्वाक्षरी नसलेला ८अ आणि सातबारा उतारा आपण आता ऑनलाईन डाऊनलोड करून घेऊ शकतो. आणि शासनाच्या सर्व कायदेशीर बाबींसाठी हा उतारा अधिकृतपणे वापरू शकतो. त्यावर ती तलाठी किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याची सहीची आवश्यकता लागणार नाही.

पूर्वी हा उतारा डाऊनलोड करण्यासाठी लागणारे प्रोसिजर अतिशय किचकट होती परंतु शासनाने या मधल्या सर्व त्रुटी आता दुरुस्त केल्या आहेत. तसेच आता काही मिनिटांमध्ये आपण ७/१२ उतारा आपल्या मोबाईल मध्ये किंवा कम्प्युटर वरती डाऊनलोड करून घेऊ शकतो. त्यासाठी हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा.

गट नंबर इन ७ १२ | गट नंबर माहिती नसताना सातबारा उतारा डाऊनलोड कसा करायचा.

 • गट नंबर इन ७ १२, सातबारा उतारा डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला शासनाच्या bhulekh mahabhumi या अधिकृत पोर्टल वेबसाईट वरती जायच आहे.
 • Bhulekh mahabhumi पोर्टल लिंक :- https://bhulekh.mahabhumi.gov.in/
 • वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही भूलेख महाभूमी पोर्टल वरती पोहोचाल.
 • आता येथे तुमच्यासमोर उजव्या बाजूला विभाग निवडा असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचा विभाग निवडायचा आहे आणि Go या बटन वर क्लिक करायचं आहे.
गट नंबर इन ७ १२ विभाग निवडा
विभाग निवडा
 • आता दुसऱ्या पेजवर ती तुम्हाला निवडलेला विभागाचे नाव दिसेल. येथे तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचा आहे.
गट नंबर इन ७ १२ विभाग
आपला विभाग
 • त्याखाली दिलेल्या शोध या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे. पण जर तुमच्याकडे गट नंबर नसेल तर तुम्ही पहिले नाव, मधील नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव या पर्यायाचा उपयोग हि करू शकता.
गट नंबर इन ७ १२
पर्याय निवडा
 • तर आपण येते संपूर्ण नाव हा पर्याय निवडू.
 • आता त्या खाली गावातील एकूण नावे असा पर्याय येईल त्यावरती क्लिक करा.
 • आता येते तुम्हाला १ ते १०० , १०१ ते २०० असे गट दिसतील. यामध्ये गावातील जितक्या लोकांची गटनंबर असतील ती या ठिकाणी अंका प्रमाणे यादी क्रमांकानुसार दाखवले जातील.
गट नंबर इन ७ १२
नावांची यादी
 • या याद्यां मध्ये प्रत्येकी 100 असे नावे असतील यामध्ये आपले नाव किंवा घरातील ज्याच्या नावावर सातबारा असेल त्याचे नाव शोधायचे आहे.
 • आता आपले नाव शोधल्यानंतर त्यावर ती क्लिक करा.
 • आता येते तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
गट नंबर इन ७ १२
७/१२ पहा
 • मोबाइल नंबर टाकल्यानंतर ७/१२ पहा या बटणावर क्लिक करा.
 • आता या पेज वरती तुम्हाला captcha code भरायचा आहे आणि verify capture to view 7/12 बटन वरती क्लिक करायचा आहे.
गट नंबर इन ७ १२
कॅपच्या कोड भरा
 • आता तुमच्या समोर तुम्हाला तुमचा ७/१२ दिसेल. त्यावर ती क्लिक करुन तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

अशा पद्धतीने आपण आपला सातबारा उतारा ऑनलाइन पाहू शकतो आणि डाऊनलोड करू शकतो.

आपल्या सातबारावरील गट नंबर ऑनलाईन कसा पाहायचा ?

मित्रांनो, आपल्याला भरपूर ठिकाणी आपल्याला सातबारा वरील गट नंबर/ सर्वे नंबर ची आवश्यकता पडते आणि अशावेळी आपल्या गट नंबर माहित नसतो किंवा आपण तो विसरतो. तर मित्रांनो आपण आता आपल्या उतार्यावरील गट नंबर इन ७ १२ /सर्वे नंबर ऑनलाईन कसा पाहायचा हे पाहणार आहोत.

 • प्रथम आपल्याला bhulekh mahabhumi या शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे.
 • महाभुलेख वेबसाईट लिंक :- https://bhulekh.mahabhumi.gov.in/
 • महाभुलेख वेबसाईट वर गेल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला विभाग निवडा हा पर्याय दिसेल.
 • येथे आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे. आणि GO या पर्यायावर ती क्लिक करायचा आहे.
 • आता येथे तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचा आहे.
 • त्या खाली शोधा पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करा.
 • आता खाली गावातील एकूण नावे हा पर्याय येईल त्यावर क्लिक करून तुमचे नाव यादीमध्ये शोधायचा आहे.
 • आपले नाव यादीमध्ये शोध त्यानंतर आपल्या नावाच्या समोर आपल्याला आपल्या गट नंबर दिसेल.
 ७/१२ गट नंबर/ सर्वे नंबर
७/१२ गट नंबर/ सर्वे नंबर

अशाप्रकारे आपण आपल्या उतार्यावरील गट नंबर/ गट नंबर इन ७ १२ / सर्वे नंबर शोधू शकतो.

7/12 वर झालेली चूक दुरुस्त करने:

अधिकार अभिलेखात (७/१२) किंवा एखाद्या महसूल नोंदवही वर जर काही चूक झाली असेल किंवा लिहिताना एखादी चूक झाली असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 155 ने अशी चुक किंवा लेखन प्रमाण दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करा करता येतो.

अशा चुका दुरुस्त करण्यापूर्वी काही हितसंबंधी‌ यांना नोटीस बजावणे आवश्यक आहे. अशा चुका लेखन प्रमाणे झाले ची संबंधित पक्षकारांनी कबुल केली पाहिजे.

कुळ म्हणजे काय ?

कसेल त्याची जमीन – असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आला. दुसर्‍याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ असे म्हटले आहे. सन 1939 च्या कूळ कायद्यानुसार सर्व प्रथम जमिनीत असणाऱ्या कायदेशीर कुळांची नावे सातबाराच्या इतर हक्काबाबत जोडली गेली. त्यानंतर 1948 ला कुळ कायदा अस्तित्वात आला.

८ अ उतारा म्हणजे काय ?

८ अ उतारा म्हणजे एकाच व्यक्तीच्या त्या गावातील एकूण जमिनी विषयीची सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते त्या उताऱ्याला ८ अ उतारा म्हणतात.

गाव नमुना 14 म्हणजे काय ?

गाव नमुना नंबर 14 या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठा बाबत ची माहिती तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती म्हणजेच गाव नमुना 14 होय.

गाव नमुना ९ अ म्हणजे काय?

गाव नमुना नंबर ९अ या नोंदवहीमध्ये शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते त्यालाच गाव नमुना 9 अ असे म्हणतात.

Leave a Comment