मित्रांनो आज मी तुम्हाला अभिनयाचे प्रकार स्पष्ट करा या तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहिती करून घायचे असेल तर या आर्टिकल मध्ये तुम्हाला ते मिळाले. अभिनयाच्या प्रकाराबद्दल आम्ही थर येथे सर्व माहिती दिली आहे.
मित्रांनो अभिनयामध्ये खुपसारे प्रकार आहेत, त्यामध्ये एक आहे वेस्टर्न आणि दुसरा आहे इंडियन. आपल्या इथे Bharata Muni नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. या शास्त्रज्ञांनी अभिनयाचे चार प्रकार सांगितले आहेत. Bharata Muni या शास्त्रज्ञांनी अभिनयाला चार प्रकारांमध्ये विभागून एका अभिनेत्याला सांगितले आहे कि या चार प्रकारांमध्ये अभिनय कसा करायचा. या आर्टिकल मध्ये आपण या चार अभिनयाच्या प्रकारांबद्दल माहिती घेणार आहोत.
अभिनयाचे प्रकार स्पष्ट करा । उत्तर
मित्रांनो मुख्यता अभिनयाचे चार प्रकार आहेत. या मध्ये आंगिक अभिनय, वाचिक अभिनय, आहार्य अभिनय आणि सात्विक अभिनय असे चार प्रकार आहेत. आता आपण या चार अभिनयांची माहिती घेऊ.
- आंगिक अभिनय – Angika abhinaya
जसे कि आंगिक या शब्दा वरून आपल्याला दिसून येत आहे कि हा अभिनयचा प्रकार आपल्या शरीराशी संबंधित आहे. अंग आणि उपांग यांचा वापरकरून जो अभिनय आपण करतो त्याला आंगिक अभिनय म्हणतात. ज्यामध्ये आपले डोके, हात, पाय, कंबर म्हणजे आपले पूर्ण शरीर हे आंगिक अभिनयाचा भाग आहे. जेव्हा आपण आपल्या शरीराचा वापरकरून अभिनय करतो तेव्हा त्याला आंगिक अभिनय म्हणतात. या अभिनया मध्ये शरीराच्या हालचाली, चेहरा आणि हावभाव या माध्यमातून भावना रसिकांपर्यंत पोहचवणे.
- वाचिक अभिनय – Vachika abhinaya
वाचिक या शब्दा मध्ये वाच्या म्हणजे वाणी, आवाज. वाचिक अभिनय हि वाणी, बोलणे आणि शब्दोउच्चरातून भावना व्यक्त करण्याची कला आहे. नाट्यवाचन, कथाकथन, आकाशवाणीवरून होणारी नभोनाट्ये हि वाचिक अभिनयाची काही उदाहरणे आहेत. शब्दाच्या उच्चरावरून पत्राची ओळख झाली पाहिजे, त्याचे वय, व्यवसाय, मानसिक अवस्था त्यातून प्रगट झाली पाहिजे अशी यात कल्पना असते. एका अभिनेत्याला वाचिक अभिनय हा आंगिक अभिनया इतकाच महत्वाचा आहे.
- आहार्य अभिनय – Aharya Abhinaya
नाटकात अभिप्रेत असलेल्या रस अथवा भाव अधिक स्पष्टपणे मांडण्यासाठी वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य आदी गोष्टीचा वापर करणारा अभिनय म्हणजे आहार्य अभिनय.
- सात्विक अभिनय – Sattvika Abhinaya
सात्विक अभिनय म्हणजे ज्यामध्ये स्वेद, स्तंभ, कंप, अश्रू, वैवर्ण्य, रोमांच, स्वरभंग आणि प्रलय याची गणना होते.
हे आहेत अभिनयाचे चार प्रकार. वरील माहितीवरून तुम्हला अभिनयाचे चार प्रकारांबद्दल संपूर्ण माहिती असेल.
मित्रांनो तुम्हला या आर्टिकल मध्ये तुमच्या अभिनयाचे प्रकार स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल अशी अशा आहे. तुम्हाला हे आर्टिकल आवडल्यास तुम्ही तुमच्या इतर मित्रांना हि share करा.