राजकीय सिद्धान्ताचा अर्थ आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा

मित्रानो आम्ही या आर्टिकल मध्ये तुमच्या राजकीय सिद्धान्ताचा अर्थ आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. तुम्ही जर या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर ते तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळेल. उत्तर पाहण्यासाठी आर्टिकल काळजी पूर्वक वाचा.

मानवाने आपल्या समूह जीवनाचे व संघटनेचे प्रश्न जाणीवपूर्वक समजावून घेण्याचा व सोडवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे राजकीय सिद्धान्त होय. राजकीय सिद्धान्तामध्ये तत्त्वज्ञान , विचारप्राणाली व विज्ञान यांच्या मूलतत्त्वाच्या आधारे बौद्धिक मांडणी केलेली असते. काळानुसार आणि परिस्थितीनुसार राजकीय सिद्धान्तावर त्या काळातील संस्कृतीचा प्रभाव पडलेला असतो . राजकीय सिद्धान्ताच्या अनेक विचारवंतांनी व्याख्या केल्या आहेत.

राजकीय सिद्धान्ताची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

राजकीय सिद्धाताचा राजकीय सिद्धांताची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील.

  • १. राजकीय सिद्धांत हे मूलतः व्यक्तीच्या बौद्धिक व राजकीय कार्यावर आधारलेले आहे . कारण एखाद्या व्यक्तीने चिंतन करून जे राजकीय वास्तव स्पष्ट केले आहे किंवा काही संकल्पना स्पष्ट केल्या आहेत , यातूनच राजकीय सिद्धांताची निर्मिती होते . त्यामध्ये प्रामुख्याने प्लेटोच्या रिपब्लिक , ॲरिस्टॉटलच्या पॉलिटिक्स किंवा रॉल्स याची ‘ ए थेअरी ऑफ जस्टिस ‘ इत्यादी ग्रंथातून राजकीय सिद्धांताची निर्मिcती झाल्याचे दिसून येते.
  • २. राजकीय सिद्धांतामध्ये व्यक्ती , समाज आणि इतिहासाचा समावेश होतो , कारण एखादा समाज कसे संघटित होऊन काम करतो , त्याचे प्रमुख तत्त्व कोणते आहे . समाजातील प्रश्न कसे सोडवता येतील या सर्व गोष्टींचा विचारें राजकीय सिद्धांत करीत असतो.
  • ३. राजकीय सिद्धांत हे एका विशेष विषयावर आधारित आहे . कारण विचारवंतांचा उद्देश केवळ राज्याच्या स्वरूपासंबंधी विचार करीत असतो . परंतु ती व्यक्ती , तत्त्वज्ञ , इतिहासकार , अर्थतज्ज्ञ , धर्मशास्त्रज्ञ किंवा समाजशास्त्रज्ञ असे कोणीही असू शकते.
  • ४. राजकीय सिद्धांताचा उद्देश केवळ राजकीय वास्तवता समजून घेणे एवढेच नाही तर समाज परिवर्तन करण्यासाठी साधने एकत्रित करणे आणि ऐतिहासिक प्रक्रिया संवर्धित करणे हा आहे.
  • ५ . राजकीय सिद्धांतामध्ये विचारधाराही समाविष्ट असते . ही विचारधारा विश्वास , मूल्ये आणि विचाराच्या आधारावर निर्माण झालेली असते . राजकीय विचारधारांच्या माध्यमातून राजकीय मूल्ये , संस्था व व्यवहाराची माहिती कळते.

अशा आहे तुम्हला तुमच्या राजकीय सिद्धान्ताचा अर्थ आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर या आर्टिकल मध्ये मिळाले असेल. तुम्हाला हे आर्टिकल आवडल्यास तुमच्या इतर मित्रांना नक्की share करा.

Leave a Comment