मित्रांनो आपण या आर्टिकल मध्ये शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. लष्कर म्हणजे सैन्य. शिवाजी महाराज्यांचे स्वराज्य निर्मितीसाठी मदत करणारे जे सैन्य होते त्या सैन्यांन विषयी शिवाजी महाराज्यांचे कोणते विचार होते. शिवाजी महाराज सैन्यांनची काळजी कशी घेत असत ते समजून घेवूया खाली आम्ही शिवाजी महाराज्यांचे लष्कर विषयक धोरण कसे होते हे विस्तार मध्ये लिहले आहे.
शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण स्पष्ट करा । उत्तर
महाराज्यांचे लष्कर विषयक धोरण कसे होते हे आम्ही मुद्यांनाद्वारे स्पष्ट केले आहे:
- महाराज्यांच्या लष्कराची शिस्त कडक होती.
- सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे. याबाबत त्यांचा कटाक्ष होता.
- त्यांनी सैनिकांना वेतन रोख रक्कमेत देण्याची व्यवस्था केली.
- मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पध्दत होती.
- महाराज्यांनी इतर राज्यांप्रमाणे जहागीर देण्याची पद्धत रद्द केली.
- महाराज्यांच्या मोहीम जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात, तेव्हा सैनिकांस जे काही मिळेल, ते सर्व राजकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद होती.
- मोहिमी मध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांना मानसन्मान केला जात असे.
- लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबीयांची उदरनिर्वाहाची काळजी घेत असत.
- लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत.
वरील सर्व माहिती वरून आपल्याला शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण कसे होते हे स्पष्टपने समजून येईल.
शिवाजी महाराजांचे सहिष्णू धोरण कसे होते.
आता आपण शिवाजी महाराजांचे सहिष्णू धोरण कसे होते आपण पाहूया.
- शिवाजी महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला. त्यांच्यापॆकी आदिलशहा, मुघल आणि सिद्धी या सत्ता इस्लामी होत्या.
- मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराज्यांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजनन मानले.
- अफजल खानच्या भेटीच्या वेळी महाराज्यांच्या सैन्यात सिद्धी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता.
- सिद्धी हिलाल हा महाराज्यांच्या सैन्यातील सरदार होता.
- स्वराज्याच्या आरमारात दोलतखान हा महत्वाचा अधिकारी होता.
- शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णु होते.
- शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकला असता तेथील मुस्लीम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोई-सवलती ते तशाच चालू ठेवत.
- शिवाजी महाराज्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफीखान लिहितो कि : शिवाजीने आपल्या सैनिकांना असा सक्त नियम केला होता कि मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुराणाची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीची स्वाधीन करावी.
या काही उदाहरणावरून शिवाजी महाराजांचे सहिष्णू धोरण कसे होते हे आपल्याला कळून येते.
मित्रांनो तुम्हला या आर्टिकल मधील माहिती आवडल्यास आम्हाला कंमेंट करून जरूर कळवा. अशा आहे तुमच्या शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळाले असेल.