सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक स्पष्ट करा

मित्रांनो या आर्टिकल मध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक स्पष्ट करा या तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत. या आर्टिकल मध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अचूक मिळेल. पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.

सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या :

( १ ) अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक उपभोक्ता , वैयक्तिक उत्पादक किंवा उत्पादक संस्था / पेढी यांसारख्या सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र , म्हणजे ‘ सूक्ष्म अर्थशास्त्र ‘ होय .

( २ ) मॉरिस डॉब यांच्या मते , “ अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय .

( ३ ) ए . पी . लर्नर यांच्या मते , ” सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते .

अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंबे उपभोक्त्याच्या रूपाने आणि उत्पादनसंस्था उत्पादकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात , हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते.

स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ व व्याख्या :

( १ ) स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित अशा समग्र घटकांचा अभ्यास केला जातो . या शाखेत एकूण रोजगार , राष्ट्रीय उत्पन्न , राष्ट्रीय उत्पादन , समग्र मागणी , समग्र पुरवठा , एकूण उपभोग व एकूण बचत , एकूण गुंतवणूक अशा मोठ्या , समग्र घटकांचा अभ्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या संदर्भात केला जातो . स्थूल ( समग्रलक्षी ) अर्थशास्त्राचे स्वरूप समुच्चयात्मक ( Aggregative ) आहे .

( २ ) प्रा . जे . एल . हॅन्सन यांच्या मते , ” स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार , एकूण बचत , एकूण गुंतवणूक , राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या मोठ्या समुच्चयाचा व त्यांच्यातील परस्परसंबंधांचा विचार करण्यात येतो .

( ३ ) प्रा . कार्ल शॅपिरो यांच्या मते , स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे .

सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक

सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक पुढील प्रमाणे स्पष्ट केले आहेत :

सूक्ष्म अर्थशास्त्रस्थूल अर्थशास्त्र
मॉरिस डॉब यांच्या मते , अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय .कार्ल शॅपिरो यांच्या मते , ” स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे .
सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात अॅडम स्मिथ पासून झाली .स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात माल्थसने केली .
सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्ती संस्था या लहान घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला जातोस्थूल अर्थशास्त्रात एकूण गट उद्योग या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो .
सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तूनिष्ठ किंवा व्यक्तिनिष्ठ असते .स्थूल अर्थशास्त्र हे समाजनिष्ठ किंवा राष्ट्रनिष्ठ असते .
सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास काही गृहितावर आधारलेला असतो .स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास गृहितावर आधारलेला नसतो .
सूक्ष्म अर्थशास्त्र हे निव्वळ तत्त्वांची किंवा सिद्धांताची चर्चा करते .स्थूल अर्थशास्त्र हे केवळ सिद्धांताची चर्चा न करता राष्ट्राला उपयुक्त अशा विविध धोरणांची चर्चा करते .
सूक्ष्म अर्थशास्त्र सीमांत उपयोगिता विश्लेषणावर आधारित आहे .स्थूल अर्थशास्त्रात सीमांत उपयोगिता विश्लेषणाला स्थान नाही .
सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकाचा अभ्यास केला जातो .स्थूल अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील समुच्चययाचा किंवा सरासरीचा अभ्यास केला जातो
सूक्ष्म अर्थशास्त्र स्थिर अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातोस्थूल अर्थशास्त्रात गतीमान अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो .
वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयोगी पडते .सामूहिक समस्या सोडविण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयोगी पडते .
सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक

मित्रांनो अशा आहे तुम्हाला तुमच्या सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र फरक स्पष्ट करा या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. जर तुम्हाला हे आर्टिकल आवडले असल्यास तुमच्या इतर मित्रांनाही हे आर्टिकल Share करा.

Leave a Comment