नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण पाहणार आहोत पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड (PANcard clubs limited) या कंपनीमध्ये जे पैसे आपण गुंतवले होते, ती पैसे परत मिळवण्यासाठी आपण क्लेम कशाप्रकारे ऑनलाईन भरायचा आहे. PANcard clubs limited refund process काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. यामधील एक जरी स्टेप चुकली तर आपण प्लॅनकार्ड क्लब लिमिटेड मधील क्लेम मिळवण्यापासून आपण वंचित राहू शकतो.
मित्रांनो काही वर्षांपूर्वी बऱ्याच लोकांनी या कंपनी मध्ये गुंतवणूक म्हणून बरीचशी रक्कम गुंतवली आहे. पण काही कारणास्तव ती कंपनी व्यवस्थित चालू शकली नाही आणि आता सीबीने त्यावरती निर्बंध लावल्यामुळे आपल्याला गुंतवलेले पैस परत मिळत आहेत. परंतु हे पैसे परत मिळवण्यासाठी आपल्याला एक क्लेम फॉर्म ऑनलाइन पाठवायचा आहे आणि आपण तो क्लेम फॉर्म कसा करायचा ते पाहणार आहोत.
पॅनकार्ड क्लब लिमिटेड या विश्वस्त मंडळाने दिलेल्या प्रपत्रामध्ये त्यांनी पूर्ण प्रोसेस दिली आहे की तो क्लेम फॉर्म कसा करायचा. आता आपण प्रत्यक्ष पाहू pclcirp dcirrus co किंवा resolute dcirrus co या वेबसाईटवर जाऊन आपण आपला क्लेम कसा भरायचा.
पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड क्लेम online भरा | http://pclcirp.dcirrus.co, https://resolute.dcirrus.io/ आणि resolute dcirrus login
resolute dcirrus claim form/ dcirrus resolute claim filing कसा भरायचा आता हे आपण पाहणार आहोत.
पॅन कार्ड क्लब क्लेम करण्यासाठी आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉप वरून http://pclcirp.dcirrus.co किंवा https://resolute.dcirrus.io/ या वेबसाईट वरती जायला हवे. dcirrus resolute किंवा resolute dcirrus हे शब्द तुम्ही गुगलमध्ये सर्च करून या वेबसाईट वरती जाऊ शकता.
http://pclcirp.dcirrus.co या लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉप वरती अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल.

आता इथे आपल्याला आपला ई-मेल आयडी मोबाईल नंबर आणि दिलेला कॅप्चा कोड भरायचा आहे. आणि Next या बटन वरती क्लिक करायचा आहे.
Next बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर वरती चार अंकी ओटीपी नंबर येईल. तू डीपी नंबर आपल्याला समोरील ओटीपी बॉक्स मध्ये भरायचा आहे आणि Submit या बटन वरती क्लिक करायचा आहे.
आता आपल्यासमोर क्लेम फॉर्म ओपन झाला आहे तो आपल्याला व्यवस्थित भरायचा आहे.
पहिल्यांदा आपल्याला identification proof या रकान्यामध्ये आधार कार्ड सिलेक्ट करायचा आहे.

त्यानंतर identification proof number या रकान्यामध्ये आपला आधार कार्ड नंबर भरायचा आहे.
आता upload identification proof मध्ये आपल्याला आपले आधार कार्ड jpg किंवा PDF फॉर्मेट मध्ये अपलोड करायचा आहे.
त्यानंतर खाली principal amount या रकान्या मध्ये पॅनकार्ड क्लब्ज या सर्टिफिकेट वरील principle amount येथे भरायचे आहे. (म्हणजेच आपण भरलेली एकूण रक्कम)

पुढे total claim amount मध्ये आपल्याला जी रक्कम पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड ने परतावा म्हणून देण्याची सांगितली होती ती रक्कम आपल्याला total claim amount मध्ये भरायचे आहे.
आता पुढील expiry of membership या रकान्यामध्ये तुम्ही जी मेंबरशिप पॅनकार्ड क्लब्ज कडून विकत घेतली होती त्या मेंबरशिप ची एक्सपायरी म्हणजेच म्युच्युरिटी डेट कोणत्या तारखेला झाली ती येते टाकायची आहे.
त्यानंतर surrender value यामध्ये तुमच्या PANcard clubs LTD च्या membership certificate वरती असलेली surrender value येथे भरा.
आता पुढे तुम्हाला From CA मध्ये जी व्यक्ती क्लेम करणार आहे त्याचे नाव आणि पत्ता दिलेले रकान्यांमध्ये कॅपिटल अक्षरांमध्ये भरायचे आहे.

आता पुढे आपल्याला relevant particuars या रकान्यामधील पाचव्या details of documents या मध्ये रकान्यामध्ये तुम्ही जोडलेल्या कागदपत्रांची नावे लिहायचे आहेत. Aadhar card, bank statement, membership certificate.

आता सहाव्या रकान्यामध्ये आपण ज्या तारखेला PANcard clubs LTD मध्ये पैसे गुंतवले त्या दिवसाची तारीख भरायची आहे. (ही तारीख पॅन कार्ड मेंबरशिप सर्टिफिकेट वरती असेल)

सातव्या कॉलम मध्ये NO असे लिहायचा आहे.
आठव्या कॉलम मध्ये not applicable असे लिहायचे आहे.
नवव्या कॉलम मध्ये आपल्याला बँकेचे डिटेल्स द्यायचे आहे. हे बँक डिटेल्स काळजीपूर्वक भरा. Ex- Bank Name- , AC No – , Ifsc code-

कॉलम नंबर दहा मध्ये क्लेम बरोबर जोडलेल्या डॉक्युमेंट ची नावे येथे लिहायचे आहेत. आधार कार्ड, बँक स्टेटमेंट, मेंबरशिप सर्टिफिकेट.
अकराव्या कॉलम मध्ये दिलेल्या नावांपैकी एक नाव निवडायचे आहे.
पुढे Name in block letters मध्ये पॉलिसी धारकाचे नाव लिहायचे आहे.

त्यानंतर position with or in relation refator या कॉलम मध्ये जर हा फॉर्म स्वतः भरला असेल तर Self असे लिहायचे आहे.
त्यानंतर खाली पॉलिसीधारकाचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे.
पुढे declaration form मध्ये ५व्या मजकूर मध्ये I am not हे बटन सिलेक्ट करायचा आहे.
त्यानंतर save as draft या बटन वरती क्लिक करून हा वरील भरलेला फॉर्म download करायचा आहे.
फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यामध्ये आपल्याला रिकाम्या रकान्यांमध्ये मागितलेली माहिती आणि सहीचा ऑप्शन आहे तिथे सही करायचे आहे.
त्यानंतर हा फॉर्म पुन्हा या वेबसाईट वरती अपलोड करायचा आहे.

हा फॉर्म आपल्याला upload signed form and declaration या option मध्ये अपलोड करायचा आहे.

त्याखालील ऑप्शन bank statement मध्ये bank statement upload करायचा आहे.
त्यानंतर खालील ऑप्शन मध्ये मेंबरशिप सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे.

dcirrus resolute claim करण्यासाठी त्यानंतर आपल्याला upload and submit claim या बटन वरती क्लिक करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे.
मित्रांनो अशा प्रकारे आपण पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड या कंपनीमध्ये आपला pancard club limited refund form भरायचा आहे.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये आम्ही फक्त पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड क्लेम बद्दल माहिती दिली आहे. ही पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेडची अधिकारी वेबसाईट नाही आहे. येथे आम्ही या क्लेम बद्दल माहिती दिली आहे जी तुम्हाला क्लेम करण्यासाठी उपयुक्त आहे.
Nice n useful information
very nice & thanks
Thank you for the detail information.
it’s very helpful
Now it is more clear how to fill the form and upload. Thanks.
pclcirp.dcirrus.co website is not working to submit my claim. Please attend to restore the site.
Site is not working properly ….unable to receive OTP
Nice आपण फार चांगली माहीति दिलीसा ,धन्यवाद
Good Work. Salute for you.
Kudal